शैक्षणिक वर्ष 2025–26 मध्ये पीएम श्री शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळा, वरवाडा येथे इयत्ता 1 ली ते 12 वी (कला व विज्ञान) मध्ये एकूण 1123 विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत.शाळा ही आदिवासी भागातील विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असून त्यांना निवास (वसतिगृह), पौष्टिक आहार, शैक्षणिक साहित्य, गणवेश व आरोग्य सुविधा मोफत पुरविल्या जातात.विद्यार्थिनींच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच क्रीडा, सांस्कृतिक, कला, विज्ञान व व्यक्तिमत्त्व विकास यावर विशेष भर देण्यात येतो. शाळेतील विद्यार्थिनी विविध तालुका, जिल्हा व राज्यस्तरीय क्रीडा व शैक्षणिक स्पर्धांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन उल्लेखनीय यश संपादन करत आहेत.सुरक्षित, शिस्तबद्ध व प्रेरणादायी वातावरणात विद्यार्थिनींना गुणवत्तापूर्ण शिक्षण व उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक संधी उपलब्ध करून देणे हे शाळेचे मुख्य उद्दिष्ट आहे.