पावसाळी क्रीडा स्पर्धा
पावसाळी क्रीडा स्पर्धा
पीएम श्री शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळा, वरवाडा येथे दिनांक 07 जुलै 2025 रोजी पावसाळी क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. या स्पर्धांमध्ये पिवळा, लाल, हिरवा व निळा अशा चार कुलांमध्ये विविध क्रीडा प्रकारांचे आयोजन करण्यात आले होते.
स्पर्धा अत्यंत चुरशीच्या व खेळाडूंच्या उत्स्फूर्त सहभागाने पार पडल्या. सर्व क्रीडा प्रकारांच्या निकालानुसार पिवळा गटाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले, तर लाल गट उपविजेता ठरला. हिरवा गटाला तृतीय क्रमांक मिळाला.
या निमित्ताने विद्यार्थिनींमध्ये संघभावना, क्रीडास्पिरीट व शारीरिक तंदुरुस्ती यांचा विकास झाला. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील शिक्षकवृंद व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धेत वरवाडा आश्रमशाळेचे घवघवीत यश
तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धा शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, सवणे येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. या स्पर्धांमध्ये पीएम श्री शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळा, वरवाडा येथील तब्बल 130 खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता.वरवाडा शाळेच्या खेळाडूंनी सांघिक क्रीडा प्रकारांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत 12 प्रथम व 3 द्वितीय क्रमांक मिळविले.• तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धा – सवणे
🏆 17 पैकी 12 अंतिम विजेते व 3 उपविजेते 🏆तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धा – सवने येथे आमच्या शाळेच्या विद्यार्थिनींनी विविध क्रीडा प्रकारांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले. एकूण 17 स्पर्धांपैकी 12 स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक तर 3 स्पर्धांमध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त करून शाळेच्या यशात मानाचा तुरा रोवला.🟡 सांघिक क्रीडा स्पर्धा
खो-खो (मुली)
• U14 – 🥇 प्रथम क्रमांक
• U17 – 🥇 प्रथम क्रमांक
• U19 – 🥇 प्रथम क्रमांक
हँडबॉल (मुली)
• U14 – 🥇 प्रथम क्रमांक
• U17 – 🥇 प्रथम क्रमांक
• U19 – 🥇 प्रथम क्रमांक
व्हॉलीबॉल (मुली)
• U14 – 🥇 प्रथम क्रमांक
• U17 – 🥇 प्रथम क्रमांक
• U19 – 🥇 प्रथम क्रमांक
रिले 4×400 मीटर (मुली)
• U17 – 🥇 प्रथम क्रमांक
• U19 – 🥇 प्रथम क्रमांक
कबड्डी (मुली)
• U19 – 🥇 प्रथम क्रमांक
• U14 – 🥈 द्वितीय क्रमांक
रिले 4×100 मीटर (मुली)
• U17 – 🥈 द्वितीय क्रमांक
• U19 – 🥈 द्वितीय क्रमांक
🟢 वैयक्तिक क्रीडा स्पर्धा
1. U19 – सायना बेंडगा (3000 मी चालणे) – 🥈 द्वितीय क्रमांक
2. U17 – जागृती मालावकर (3000 मी चालणे) – 🥇 प्रथम क्रमांक
3. U19 – संजना मोर (3000 मी धावणे) – 🥈 द्वितीय क्रमांक
4. प्रतीक्षा थोरात (3000 मी धावणे) – 🥇 प्रथम क्रमांक
5. U17 – सोनू नाईक (1500 मी धावणे) – 🥈 द्वितीय क्रमांक
6. U19 – अंजली दुमाडा (800 मी धावणे) – 🥈 द्वितीय क्रमांक
7. दीदींना मागात (गोळाफेक) – 🥇 प्रथम क्रमांक
8. U19 – अल्पना बीज (भालाफेक) – 🥇 प्रथम क्रमांक
9. U14 – पायल मालावकर (उंचउडी) – 🥇 प्रथम क्रमांक
10. U19 – रक्षना शनवार (उंचउडी) – 🥇 प्रथम क्रमांक
11. U14 –प्रणाली प्रदीप उराडे 100 मी धावणे – 🥈 द्वितीय क्रमांक
12. U17 – मोनिका वसवला 100 मी धावणे – 🥇 प्रथम क्रमांक
13. U19 – योगिता गुरोडा 100 मी धावणे – 🥈 द्वितीय क्रमांक
प्रकल्प स्तरीय क्रीडा स्पर्धा सवणे
प्रकल्प स्तरीय क्रीडा स्पर्धा सवणे येथे संपन्न झाली यामध्ये पीएम श्री शासकीय कन्या आश्रमशाळा , वरवाडा ता.तलासरी जि पालघर येथील १०२ खेळाडू मुली सहभागी झाल्या. सांघिक ०७ प्रथम क्रमांक व 3 द्वितीय क्रमांक मिळाला.
प्रकल्प स्तरीय क्रीडा स्पर्धा – सवणे
🏆🏆 सांघिक क्रीडा स्पर्धांतील यश 🏆🏆
🏃♀️ खो-खो
• U-14 – द्वितीय क्रमांक
• U-17 – प्रथम क्रमांक
• U-19 – प्रथम क्रमांक
🤾♀️ हँडबॉल
• U-14 – द्वितीय क्रमांक
• U-17 – द्वितीय क्रमांक
• U-19 – प्रथम क्रमांक
🏐 व्हॉलीबॉल
• U-14 – प्रथम क्रमांक
🤼♀️ कबड्डी
• U-19 – प्रथम क्रमांक
🏃♀️➡️ 4 × 400 मी. रिले
• U-17 – प्रथम क्रमांक
• U-19 – प्रथम क्रमांक
🏅 वैयक्तिक क्रीडा स्पर्धा
1. रक्षणा शनवारी – उंचउडी – प्रथम क्रमांक
2. दिदीना मांगात – गोलाफेक – द्वितीय क्रमांक
3. पायल मालावकर – उंचउडी – प्रथम क्रमांक
4. मोनिका वसवला – 100 मी. धावणे – द्वितीय क्रमांक
5. अल्पना बीज – भालाफेक – प्रथम क्रमांक
विभागीय क्रीडा स्पर्धा , शेंडेगाव
विभागीय क्रीडा स्पर्धा ,शेंडेगाव शहापूर येथे संपन्न झाली असून त्यामध्ये पीएम श्री शासकीय कन्या आश्रमशाळा , वरवाडा ता.तलासरी जि पालघर येथील ६५ खेळाडू मुली सहभागी झाल्या. तेथे सांघिक ०४ प्रथम क्रमांक व ०३ द्वितीय क्रमांक मिळाला.
🔹 U14 वयोगट
1. 🏐 Volleyball – द्वितीय क्रमांक
🔹 U17 वयोगट
1. 🤾 खो-खो – द्वितीय क्रमांक
2. 🏃 4×400 मीटर रिले – प्रथम क्रमांक
🔹 U19 वयोगट
1. 🤾 Handball – प्रथम क्रमांक
2. 🤾 खो-खो – प्रथम क्रमांक
3. 🏃 4×400 मीटर रिले – प्रथम क्रमांक
4. 🤼 कब्बडी – द्वितीय क्रमांक
🏅 वैयक्तिक स्पर्धा (U19)
1. 🏃 मोनिका वसावा – 100 मीटर धावणे – तृतीय क्रमाक
2. 🤸 रक्षणा शनवार – उंच उडी – प्रथम क्रमांक
राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा
राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा अमरावती येथे संपन्न झाल्या त्यामध्ये पीएम श्री कन्या आश्रमशाळा , वरवाडा ता.तलासरी जि पालघर येथील ३६ खेळाडू मुली सहभागी झाल्या.सांघिक ०३ द्वितीय क्रमांक व ०३ तृतीय क्रमांक मिळाला.
U14
🏐 व्हॉलीबॉल
०३ खेळाडू सहभागी झाले.
U17
🏃♀️ खो-खो
• U-17 – तृतीय क्रमांक (जव्हार संघातून ०५ खेळाडू सहभागी)
🏃♀️➡️ 4 × 400 मी. रिले
• U-17 – 4 x 100 रिले तृतीय क्रमांक
🤾♀️ हँडबॉल
• U-17 उधवा संघातून ०२ खेळाडू सहभागी
U19
🏃♀️ खो-खो
• U-19 – द्वितीय क्रमांक
🏃♀️➡️ 4 × 400 मी. रिले
• U-17 – 4 x 100 रिले द्वितीय क्रमांक
🤾♀️ हँडबॉल
• U-19 – तृतीय क्रमांक
🤼♀️ कबड्डी
• U-19 – द्वितीय क्रमांक (जव्हार संघातून ०3 खेळाडू सहभागी)
🏅 वैयक्तिक क्रीडा स्पर्धा
1. रक्षणा शनवारी – उंचउडी – तृतीय क्रमांक